ZP BHARTI 2023 I ZP EXAM DATE 2023
![]() |
zp bharti 2023 |
ZP BHZRTI 2023 I ZP EXAM DATE 2023: अखेर खूप वर्ष वाट पाहिल्यानंतर ZP जिल्हा परिषद परीक्षा होणार आहेत .सुरवातीला २०१९ मध्ये जाहिरात आल्यानंतर सर्वच विध्यार्थी खूप आनंदी होते पण COVID काळामुळे सर्वांच्याच आनंदावर पाणी फिरले आणि भरती प्रक्रिया लांबणीवर गेली.त्यानंतर २०२२ ला नवीन जागा साठी भरती जाहिरात जाहीर झाली परंतु अजूनपर्यंत तरी त्याची काही अंमलबजवणी झाली नाही परंतु आत्ता २०२३ मध्ये नवीन GR जिल्हा परिषद बांधकाम , सामान्य प्रशासन विभाग मार्फत प्रसिद्ध झाला असून लवकरच जाहिरात देखील RELEASE होणार आहे .जाहिरात आल्यानंतर FORM कशा प्रकारे FILL करायचा आहे तो नमुना मी आज तुम्हाला देत आहे
👉ZP BHARTI २०२३ परीक्षा स्वरूप :
ZP BHARTI २०२३ परीक्षा हि IBPS मार्फत होणार असून त्यांच्या सोबत करार देखील करण्यात आला आहे .IBPS COMPANY हि नामांकित कंपनी म्हणून ओळखली जाते .आणि त्यांचा अभ्यासक्रम सुद्धा थोड्या फार प्रमाणात बँकिंग लेवेल चा असतो .तरी उमेदवारांनी त्यांचा SYLLABUS समोर ठेवून अभ्यास करायचा आहे .याची माहिती मी पुढे तुम्हाला देणारच आहे
जिल्हा परिषद भरती स्वरूप जिल्हा परिषदेतर्गत येणाऱ्या पदांसाठी होणारी परीक्षा 100 प्रश्नांची असून प्रत्येक प्रश्नाला 2 गुण याप्रमाणे 200 गुणांची राहील . ही परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची राहील . या परीक्षांना मुलाखत नसल्यामुळे ह्या पदांसाठी अंतिम निवड लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणानुसार असेल
👉ZP BHARTI २०२३ परीक्षा अभ्यासक्रम
सामान्यज्ञान – जगाचा भूगोल , भारताचा भूगोल , महाराष्ट्राचा भूगोल , महाराष्ट्रातील जिल्हे व त्यांची वैशिष्ट्ये , भारताचा इतिहास ( महाराष्ट्राशी संबंधित ) , भारतीय संविधान पंचायतराज्य व्यवस्था सामान्य विज्ञान , दिनविशेष , व्यक्तिविशेष , चालू घडामोडी .
मराठी व्याकरण -वर्णमाला व उच्चारस्थान , शब्दांच्या जाती ( नाम , सर्वनाम , विशेषण , क्रियापद , अव्यय ) , विभक्ती , समास अलंकार , काळ , वाक्प्रचार , समानार्थी , विरुद्धार्थी शब्द , म्हणी .
इंग्रजी व्याकरण - Parts of Speech Pronoun , Adjective Verb , - Preposition , Conjunction , Articles , Sentence , Tense , Active Passive Voice Direct- Indirect Speech , Synonyms & Antonyms , Idioms & Pharases .
अंकगणित - संख्याज्ञान , स्थानिक किंमत , गणिताच्या क्रिया , लसावी मसावी , अपूर्णांक , दशांश अपूर्णांक , वर्ग , वर्गमुळ , घन , घनमुळ , घातांक , सरासरी , गुणोत्तर प्रमाण , शतमान , शेकडेवारी , सरळ व्याज , चक्रवाढ व्याज , नफा - तोटा , काळ - काम , वेग- अंतर , क्षेत्रफळ , परिमिती .
👉ZP BHARTI २०२३ असणारी पदे
अनुक्रमांक | पदे |
---|---|
१ | लघुलेखक ( निम्न श्रेणी ) |
२ | वरिष्ठ सहाय्यक ( लिपीक ) |
३ | वरिष्ठ सहाय्यक लेखा विस्तार अधिकारी ( कृषि ) |
४ | विस्तार अधिकारी ( पंचायत ) |
५ | विस्तार अधिकारी ( शिक्षण ) |
६ | विस्तार अधिकारी ( सांख्यिकी ) |
७ | स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ( ल.पा. |
८ l | कनिष्ठ सहाय्यक लेखा |
९ | पशुधन पर्यवेक्षक |
१० | प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांत्रिकी |
११ | लघुटंकलेखक लघुलेखक ( उच्च श्रेणी ) |
१२ | आरोग्य पर्यवेक्षक |
१३ | आरोग्य सेवक ( पुरुष ) ४० % |
१४ | आरोग्य सेवक ( पुरुष ) ५० % |
१५ | औषध निर्माण अधिकारी |
0 Comments